Site icon Aapli Baramati News

BARAMATI । बारामतीमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात; मुस्लिम युवकांनी काढली डिजेमुक्त मिरवणूक

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी   

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती बारामती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवार दि. १ ऑक्टोबर ईद ए मिलादनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी मुस्लिम युवकांनी डिजेमुक्त मिरवणूक काढत एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहचविण्यासाठी विविध धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी शहरातील जामा मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये धर्मगुरू, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोडे, उंटासह झेंडे घेऊन मदिना शरीफचा आकर्षक देखावा या मिरवणूकीत साकारण्यात आला.

स्वातंत्र्यसेनानी, नगरभूषण भाई गुलामअली सामाजिक संस्था व मरहूम सलीमभाई शेख मित्र परिवाराच्या वतीने गुणवडी चौकात मुस्लिम बांधवांना केक आणि बिस्किट वाटप करण्यात आले. बारामती आम मुस्लिम जमातचे अध्यक्ष हाजी जब्बार पठाण, माजी नगराध्यक्ष सुनिल पोटे, सुभाष सोमाणी, अॅड. रमेश कोकरे, सुनिल सस्ते, निलेश इंगुले, अमजद बागवाण, परवेझ सय्यद, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, पोलीस निरिक्षक दिनेश तायडे, बिट्टू कोकरे, निलेश कोठारी, शब्बीर शेख,गणेश जोजारे, रोहित बनकर, हरुणबाबा शेख,पत्रकार संतोष जाधव,राजु कांबळे,सिकंदर शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शहरातील कसबा येथे या मिरवणुकीचे स्वागत कसबा यंग सर्कल, गरिब नवाज फ्रेंड्स सर्कल, मलिक फ्रेंड्स सर्कल, सल्तनते ए उस्मानिया यंग सर्कल,  ग्रीन स्टार ग्रुप,अलिशान फ्रेंड्स सर्कल यांनी केले. तसेच केक, बिस्किट, टोपी, मखनी, वाटप करण्यात आले. हसन नाना ट्रस्ट, मुजावर वाडा यंग सर्कल, हुसेनभाई व अल्ताफभाई मित्र परिवार,  गुनवडी चौक येथे मुस्लिम यंग सर्कल, टिपु सुलतान प्रतिष्ठान, सर्वधर्म समभाव समिती,‍ सुलतान ग्रुप, फुल अॅण्ड फाइनल ग्रुप व फरहान मुन्ना मित्र परिवार यांनी मिठाई, खाऊ, केक, पाणी, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिकिलकर मित्र परिवारासह गांधी चौकात बागवान बॉयजकडुन स्वागत करण्यात आले. भिगवण चौक, इंदापुर चौक येथुन या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. जामा मशिदीच्या आवारात सामूहिक प्रार्थना करण्यात आली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version