Site icon Aapli Baramati News

BARAMATI CRIME : पती-पत्नीत वाद झाला अन पत्नीनं पतीच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; बारामती तालुक्यातील पारवडी येथील घटना

ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram

बारामती : प्रतिनिधी    

पती-पत्नीमध्ये सहसा वाद हे होतच असतात. रूसवे-फुगवेही चालतात. मात्र बारामती तालुक्यातील पारवडी येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. घरात झालेल्या वादातून पत्नीने पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत संबंधित पती ४० टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सागर मधुकर कुंभार (वय ३५, रा. जाधववस्ती, पारवडी) असे या घटनेतील जखमी पतीचे नाव आहे. बारामती तालुका पोलिसांनी कविता सागर कुंभार हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सागर आणि कविता हे दोघेही पारवडी परिसरात वास्तव्यास आहेत. सागर हा चालकाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.

या दोघा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून सातत्याने वाद सुरू होते. मंगळवारीही त्यांच्यात वाद झाले. त्यातूनच पत्नी कविता हिने सागर याला जीवे मारण्याच्या उद्देशाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकले. त्यामध्ये सागर हा ४० टक्के भाजला आहे. तोंडासह छाती, पोट, गुप्तांग आणि पाठीमागील बाजूवर मोठ्या प्रमाणात भाजले आहे. सध्या सागरवर उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे उकळते पाणी टाकल्यानंतर कविताने तुला आता जीवंत सोडणार नाही असे म्हणत सागरच्या डोक्यात लोखंडी पाईपनेही मारहाण केली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी कविता कुंभार हिच्यावर भादंवि कलम ३०७, ३२४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version