बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील कसबा परिसरातील लेंडीपट्टी येथील सावित्रीबाई फुले उद्यानासमोर वास्तव्यास असलेल्या आमीर काझी या युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आमीर शकूर काझी हा युवक बारामती शहरातील कसबा येथील शिवाजी उद्यान येथे गॅरेज चालवत होता. आज दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
More Details Awaited….