Site icon Aapli Baramati News

BARAMATI BREAKING : बारामतीच्या नामांकित लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पतीनेच खून केल्याची प्राथमिक माहिती

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील एका नामांकित लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिलेचा पतीनेच हा खून केल्याची आणि हे दांपत्य दौंड तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी हा खूनाचा प्रकार घडला असून संबंधित महिलेच्या पतीनेच नातेवाईकांना याबद्दल माहिती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या घटनेनंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील एका लॉजवर आज एक जोडपे आले होते. सायंकाळी यातील महिलेचा पती लॉजमधून बाहेर पडला. त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती स्वत:च नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी बारामतीतील या लॉजचा शोध घेतल्यानंतर ही घटना उघड झाली आहे.

दरम्यान, पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमक्या कोणत्या कारणातून ही हत्या झाली किंवा या घटनेमागील सत्य पोलिस तपासाअंतीच समोर येणार आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version