बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ते बारामती तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेणार आहेत. मागील काही दिवसांत बारामती तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी हवालदिल झाला असून अजितदादांच्या आजच्या दौऱ्यात के निर्णय होतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ते बारामती तालुक्यातील जिरायत भागातील टंचाईग्रस्त गावांना भेटी देणार आहेत. गेल्या काही दिवसांत पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीपाचे पीक वाया गेले. आता रब्बीतील पिकांसाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी तालुक्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे.
बारामती तालुक्यात प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेही टंचाईग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. अजितदादा या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून सद्यस्थितीची माहिती घेणार आहेत. बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील गावांमध्ये अजितदादा स्वत: पाहणी करणार आहेत. त्यामुळे आता या भागांसाठी अजितदादा काही निर्णय घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.