Site icon Aapli Baramati News

Baramati Breaking : बारामती शहरात ३ लाख रुपयांचा गुटखा जप्त; चारचाकीतून सुरू होती गुटख्याची विक्री

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहर पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक केली आहे. गणेश दत्तात्रय मदने (वय २५ वर्ष, रा. मळद, बारामती) असे गुटखा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामती शहरातील गुणवडी रस्त्यावरील सार्थक कलेक्शनशेजारी श्री दत्त ऑटोलाईन्स या दुकानासमोर गुटखा व तंबाखूने भरलेली एक क्वालिस गाडी उभी असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली.  त्यानुसार त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक व उपविभागीय कार्यालयातील पथकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला.

या छाप्यात गणेश दत्तात्रय मदने हा विविध प्रकारचा गुटखा विक्रीसाठी घेऊन आल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील क्वालिस गाडीसह (क्र. MH10AS1999 ) विविध कंपन्यांचा ३ लाख १९ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. त्याच्याकडून एकूण ८ लाख ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी भा. दं.वि. कलम ३२८ व अन्न सुरक्षा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सुनील मोटे, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, कल्याण खांडेकर, श्री. कोठे, अभिजीत कांबळे, दशरथ इंगवले व उपविभागीय कार्यालयाकडील कर्मचारी दराडे, साळवे, भोई यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version