Site icon Aapli Baramati News

BARAMATI BIGGEST BREAKING : बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यात मिळाल्या तलवारी; शहरात उडाली खळबळ..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यात आज दुपारी काही तलवारी मिळून आल्या आहेत. शहर पोलिसांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या तलवारी बाहेर काढल्या आहेत. आज दुपारी तीन हत्ती चौकात ही शोधाशोध सुरू असताना नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, नीरा डाव्या कालव्यात विविध शस्त्र मिळून आल्याच्या बातमीने शहरात खळबळ उडाली आहे.

बारामती शहरात मागील तीन दिवसात जवळपास १८ ते १९ सदनिका फोडून त्यातून मोठ्या प्रमाणात चोरीला गेला. त्यांनंतर बारामती शहर पोलिसांकडून सातव चौकात झालेल्या चोरी प्रकरणात चौघांना अटक करण्यात यश मिळाले आहे. अशातच आज शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यात काही शस्त्रे मिळाल्याची बातमी पुढे आली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता काही तलवारी मिळून आल्या आहेत.

दुसरीकडे, तीन हत्ती चौकात नीरा डाव्या कालव्यावर आज दुपारी ही शोध मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये काही शस्त्रे सापडली आहेत. मात्र त्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. कालव्यात आणखी काही शस्त्रे मिळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शोधमोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कालव्यात मोठा शस्त्रसाठा सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी काही तलवारी मिळून आल्या आहेत. आणखी काही शस्त्रे आहेत का याचाही शोध घेतला जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version