बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. पहाटे ६ वाजताच अजितदादांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कामाला सुरुवात केली. शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करत सुचना केल्या.तर सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबार पार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासूनच आपल्या कामाचा झपाटा सुरु करतात. आजही नेहमीप्रमाणे अजितदादांनी पहाटे ६ वाजल्यापासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची अजितदादांनी पाहणी केली. यावेळी कामे दर्जेदार करण्याबरोबरच मुदतीत पूर्ण करावीत अशा सुचना त्यांनी ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.
या दौऱ्यानंतर सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात जनता दरबार होणार आहे. यामध्ये अजितदादा नागरीकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. कोणतीही समस्या घेवून गेल्यानंतर अजितदादांकडून जागेवरच तोडगा काढला जातो. त्यामुळे नागरीक जनता दरबारात मोठी गर्दी करतात.