Site icon Aapli Baramati News

BARAMATI : अजितदादा पोहोचले काटेवाडीतील किल्ला पाहण्यासाठी; दरवर्षी देतात धनी परिवाराच्या किल्ल्याला भेट..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत आहेत. विविध कौटुंबिक कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. डेंग्युतून बरे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आज अजितदादांनी दरवर्षीप्रमाणे काटेवाडीतील धनीवस्ती येथे धनी कुटुंबाने बनवलेल्या किल्ल्याची पाहणी केली.

बारामती तालुक्यातील काटेवाडीत धनी अर्थात काटे-देशमुख परिवाराकडून दरवर्षी दिवाळीत मोठ्या किल्ल्याची उभारणी केली जाते. प्रत्येक वर्षी नवनवीन किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे उभारल्या जातात. यावर्षी धनी परिवाराने जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे.. आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या किल्ल्याची पाहणी करत धनी परिवाराशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी धनी कुटुंबाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांच्या गोठ्यातील गावरान गाईंचीही पाहणी घेत गोठ्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी धनी कुटुंबीयांशी मुक्तपणे संवाद साधला. गेल्या तीन पिढ्यांपासून धनी परिवाराने किल्ला उभारणीची ही प्रथा जपली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी अजितदादांसह पवार कुटुंबीय या किल्ल्याची पाहणी करत असतात.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version