Site icon Aapli Baramati News

कृषी उद्योग मुल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अजित पवार

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फेरनिवड करण्यात आली. रविवारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने अजित पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली.

संस्थेची नवीन कार्यकारिणीही या सभेत निवडण्यात आली. उपाध्यक्षपदी दशरथराव धुमाळ, सचिवपदी प्रफुल्ल तावरे, खजिनदारपदी सुभाष सोमाणी यांची आणि विश्वस्तपदी सुनेत्रा पवार, मिलिंद जगताप, नरेंद्र गुजराथी, सय्यद दस्तगीर, दत्तात्रय वाबळे, प्रीतम पहाडे, प्रणव सोमण यांची निवड करण्यात आली आहे.

या संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय असून दीड हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. 80 शिक्षक अध्यापन करतात. संस्थेच्या वतीने आयटीआय महाविद्यालय देखील सुरु करण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा या मागे उद्देश आहे. या शिवाय स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट व इंग्रजी माध्यमाची शाळाही संस्थेच्या वतीने चालविली जाते.en


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version