Site icon Aapli Baramati News

अजितदादांचा उद्या बारामतीत ‘जनता दरबार’; विद्या प्रतिष्ठानमध्ये घेणार नागरीकांच्या भेटी..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह उत्सव, सभांवर निर्बंध आले होते. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबारही या काळात बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता राज्यभरातील कोरोना निर्बंध उठल्यामुळे उद्या अजितदादांचा जनता दरबार होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. समोर आलेलं काम तात्काळ हाती लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच नागरीक मोठ्या अपेक्षेने अजितदादांच्या जनता दरबारात हजेरी लावत असतात. नागरिकांना आपल्या कामासाठी झुलवत न ठेवता त्वरीत त्यांचे काम मार्गी लावण्याच्या पद्धतीमुळे अजितदादांकडे लोकांची गर्दी होत असते.

मध्यंतरी कोरोनामुळे हा दरबार बंद होता. आता पुन्हा हा दरबार सुरु होत आहे. रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या परिसरात अजितदादा नागरीकांच्या भेटी घेणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version