Site icon Aapli Baramati News

१९ घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला बारामती शहर पोलिसांनी केले गजाआड

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील मोतीबाग येथील एका मेडिकलचे शटर उचकून चोरी करणाऱ्या चोरट्याला बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाश विठ्ठल पाटोळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. दरम्यान, भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात हा सराईत चोरटा जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती शहरातील मोतीबाग येथील एका मेडिकलचे शटर उचकटून चोरी करत असताना त्या चोरट्याला स्थानिक नागरिकांनी पकडले. त्यानंतर बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी घेतली. पोलीस येताच हा आरोपी भिंतीवरून उडी मारून पळून जात असताना खाली पडून जखमी झाला.  

या आरोपीची चौकशी केली असता त्याने मोतीबाग येथील पाटील मेडीकलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.  त्याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे १९  गुन्हे दाखल आहेत. या सराईत गुन्हेगाराकडून रोख रक्कम आणि पुणे शहरातून चोरी केलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अरुण रासकर हे करीत आहेत.          

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहा.फौजदार अरुण रासकर, संजय जगदाळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, मनोज पवार यांनी ही कारवाई केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version