सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सभासद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी बारामतीत झालेल्या कार्यक्रमात अजितदादांनी अचानकपणे ही वेळ देत मेळावा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम २० सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आज बारामतीत दूध संघाच्या कार्यक्रमावेळी अजितदादांनी कारखाना निवडणुकीबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी सभासद मेळावा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.
वाघळवाडी येथील सोमेश्वर पॅलेस मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सभासद, पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि सोमेश्र्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.