आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

सोमेश्वरच्या बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेची दरडग्रस्तांना मदत

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ सोमेश्वरनगर यांनी दरडग्रस्त व अतिवृष्टीमुळे बाधीत कुटुंबासाठी मदतीचे  आवाहन केले होते. आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थ, पोलीस सामाजिक संघटनांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामध्ये तब्बल पावणे दोन लाखाचे धान्य, किराणा, सुका मेवा, खाऊ, नवीन साड्या, रोख मदत जमा झाली. ही मदत नुकतीच महाबळेश्वर परिसरातील गावांमध्ये पोहोच करण्यात आली.

सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, एसटीचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, कैलास मगर, सरपंच वैभव गायकवाड यांच्या उपस्थितीत सोमेश्वरमधून या मदतीचे वाहन पाठवण्यात आले.  बारामतीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत माहिती घेतली.

सैनिक संघटनेचे संस्थापक जगन्नाथ लकडे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष गणेश आळंदीकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, अनिल शिंदे, राजाभाऊ थोपटे, राजाराम शेंडकर, नितीन शेंडकर, बुवासाहेब हुंबरे, सुखदेव शिंदे, तानाजी भापकर, बाळासाहेब चौधरी यांनी महाबळेश्वर परिसरातील कळम, मालुसरे व चिखली या दुर्गम भागातील लोकांना ही मदत पोहोच केली.

या उपक्रमात आजी-माजी सैनिकांसह परिसरातील विविध मान्यवरांनी रोख मदत, धान्य दिले.  सोमेश्वरच्या  सैनिक संघटनेद्वारे परिसरातील दानशुरांच्या मदतीने  जवळपास एक टन धान्य व किराणा प्रत्येक गावाला दिला असला तरी  अद्याप या गावाना मदतीची गरज आहे.

दुर्गम भागात शिक्षक ठरतोय दुआ

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दुर्गम भागात शिक्षक वर्ग आपल्या ओळखीनी सत्य परिस्थीती समाजासमोर मांडत ग्रामस्थाना दिलासा देत आहेत. प्राथमिक शिक्षक गणेश पखाले, श्री. दानवले, श्री. ढेबे, श्री. गोफणे  हे या दुर्गम भागात शिकवत आहेत. त्यांच्या माध्यमातून पिडीत  ग्रामस्थाना मदत देणे सुकर ठरत आहे. त्यामुळे हे शिक्षक आता या ग्रामस्थांचा खरा आधार ठरल्याचे या दुर्गम भागात  चित्र आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us