बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड उद्या सोमवारी (दि.८) होत आहे. या निवडीत कुणाला संधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांपैकी कुणाची लॉटरी लागते याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.
मागील महिन्यात सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने घवघवीत यश मिळवले. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोमेश्वरच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात हजेरी लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निकालाबद्दल समाधान व्यक्त केले होते.
सोमवारी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडत आहे. अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. अध्यक्षपद कुणाला द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत. त्यामुळे ते कुणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.