Site icon Aapli Baramati News

सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ग्रामीण पेंचाक सीलाट चॅम्पियनशीप स्पर्धा संपन्न

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पुणे ग्रामीण पेंचाक सीलाट असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रेग्यु, तुंगल, फाईट, व गंडा अश्या चार टप्प्यात ही स्पर्धा पार पडली. 

या स्पर्धेचा शुभारंभ काटेवाडीचे सुपुत्र तथा आयपीएस अधिकारी अल्ताफ शेख आणि उपसरपंच समीर मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र झारगड,  पुणे ग्रामीण पेंचाक सीलाटचे साहेबराव ओहोळ, अजित मलगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या स्पर्धेत बारामती, दौंड, पुरंदर, इंदापूर व शिरूर आदी तालुक्यातील ८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. तसेच महाराष्ट्र पोलीस (मुंबई) यांच्या वतीने मिनल ओहोळ यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. 

पेंचाक सीलाट या खेळाला देशातील विद्यापीठे, पोलीस क्रीडा स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि केंद्रीय क्रीडा विभागाची मान्यता आहे. तर या खेळाला केंद्र सरकारकडून ५ टक्के राखीव जागांसाठी आरक्षण देण्यात आले आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version