बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस बारामतीत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गदिमा सभागृहात मुंबईत झालेल्या व्हर्चुअल रॅलीचे थेट प्रक्षेपण करत केक कापून आणि दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुंबईत झालेल्या शरद पवार यांच्या वाढदिवस सोहळ्याचे थेट प्रक्षेपण येथील गदिमा सभागृहात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सभापती नीता फरांदे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, गटनेते सचिन सातव, अमरसिंह जगताप, मदन देवकाते, धनवान वदक, संदीप जगताप, रोहित कोकरे, प्रदीप धापटे, शैलेश रासकर आदी मान्यवरांच्या हस्ते केक कापून शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या बॅटरीवर चालणाऱ्या चोवीस तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
महिला राष्ट्रवादी शहाराध्यक्षा अनीता गायकवाड, युवकाध्यक्ष राहुल वाबळे, अमर धुमाळ, अॅड. रवींद्र माने, सुधाकर माने, भाग्यश्री धायगुडे, सुनिल बनसोडे, नितीन सातव, नितीन काकडे, विजय खरात, बाळासाहेब परकाळे, फिरोज बागवान, बी.आर चौधरी, वैभव बुरुंगले, केंद्रीय अधिकारी गौरी साळुंखे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.