बारामती : प्रतिनिधी
आखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार वाढदिसानिमित्त श्रीमंत आबा गणपती लसीकरण केंद्रावर ५०० लोकांना मोफत लसीकरण करण्यात आले. तसेच यावेळी केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याची सुरुवात आखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाच्या कार्यक्रमाने करण्यात आली. शरद पवार हे या मंडळाचे संस्थापक व आजीव सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून सातत्याने मंडळाला सहकार्य मिळत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले.
श्रीमंत आबा गणपती लसीकरण केंद्रांवर झालेल्या कार्यक्रमाला बारामती बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, गटनेते सचिन सातव, श्याम इंगळे, जयसिंग पवार, प्रकाश पळसे, संजय लालबिगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बारामती बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सचिन सातव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अविनाश भापकर यांनी केले.
श्रीकांत जाधव, कपिल सावंत, स्वप्नील भागवत, मोहन पंजाबी, निखिल लोंढे, दत्ता हारके, अरुण नलावडे, स्वप्नील शेळके, उदय देसाई, किरण इंगळे, राहुल जाधव, चेतन मुन्ना जाधव, निलेश गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. श्रीमंत आंबा गणपती लसीकरण केंद्रात प्रशांत हेंद्रे, अतुल भागवत, सोनू बामणे, दीपक ननावरे, हार्दिक भागवत, जमीर तांबोळी, चेतन बाळू जाधव, अतिश गायकवाड हे कार्यकर्ते कामकाज पाहत आहेत.