आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामतीमहानगरेमहाराष्ट्र

विद्या प्रतिष्ठानच्या पाच विद्यार्थ्यांना रोजगारासह मिळाली उच्च शिक्षणाची संधी..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना रोजगारासह उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. एम्फसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये रोजगार आणि बीट्स पिलानी या नामांकित संस्थेत उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली. 

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रिया कदम, प्रशांत गोलांडे, आकाश क्षिरसागर, गणेश यादव व सौरभ शहाणे या पाच विद्यार्थ्यांना एम्फसिस कंपनीत रोजगाराची संधी मिळाली आहे. तसेच बीट्स पिलानी या नामांकित संस्थेत ‘एमटेक’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार असून त्यांचे शैक्षणिक शुल्क कंपनीमार्फतच भरले जाणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन लाख पाच हजार रुपये  मानधनही मिळणार आहे. 

विद्या प्रतिष्ठान संस्थेमध्ये रोजगार विभागात प्रा. विशाल कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. गजानन जोशी, डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे यांच्या सहकार्यातून ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामंकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  महाविद्यालयाच्या रोजगार विभागातून चालू वर्षात ६० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, किरण गुजर, मंदार सिकची, डॉ. राजीव शहा व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


ह्याचा प्रसार करा
बारामती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us