आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

रेशनिंगचा माल खुल्या बाजारात विकणार्‍या दोघांवर बारामतीत गुन्हा दाखल

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरामध्ये गरजूंना आलेला रेशनिंगचा तांदूळ संगनमताने खुल्या बाजारात दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील वाहनासह २५ पोती तांदूळ असा तब्बल १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मोहन शंकर रणदिवे ( रा. कसबा, बारामती) व वाहनचालक सोमनाथ रामचंद्र भापकर दनाने ( रा. सटवाजीनगर, बारामती) या दोघांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्वस्त धान्य दुकानात गरजूंसाठी वितरित होणारा तांदूळ खरेदी करून तो खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी पाळत ठेवून मालवाहतूक वाहन (क्र. एमएच ४२ एक्यु ३६०३) ताब्यात घेतले. या या वाहनात एकूण २५ पिशव्या तांदूळ आढळून आला. चालक सोमनाथ भापकर याच्याकडे विचारणा केली असता या पिशव्यांमध्ये तांदूळ असून तो मोहन रणदिवे यांच्या दुकानातील असून,तो बारामती बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.  पोलिसांनी तांदूळाने भरलेली खाकी रंगाची सरकारी शिक्का असलेली पोती, तसेच मालवाहतूक वाहन असा एकूण १ लाख ७८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, श्री. पवार यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us