Site icon Aapli Baramati News

रायगडमधील पूरग्रस्तांना एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा मदतीचा हात

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यात आला. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फोरम सदस्यांनी निधी गोळा करुन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली पाचशे किट रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील सडवली व आदिवासी पाडा, काटेतळी, धामणदेवी, पारटे कोंड, काटेतळी, गणेशवाडी या गावातील पूरग्रस्तांना दिली. 

फोरमचे सदस्य किरण कारंडे, महादेव वणवे, दादासाहेब दराडे, सोमनाथ कर्चे यांनी ही मदत प्रत्यक्षपणे या गावात जाऊन वितरीत केली. या किटमध्ये साखर, तांदूळ, गव्हाचे पीठ, तूरडाळ, चहा पावडर, हळद, मिरची पावडर, गोडे मसाला, बेसनपीठ, दूध पावडर आदींचा समावेश आहे. 

दरम्यान नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, नगरपालिकेतील गटनेते सचिन सातव यांच्या उपस्थितीत बारामतीतून मदतीचा ट्रक रवाना करण्यात आला. 

प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या काळात फोरम सदस्य उत्स्फूर्तपणे मदत गोळा करुन ती गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. रायगड जिल्ह्यातील अतिशय दुर्गम गावातील पूरग्रस्त लोकांना फोरमच्या वतीने ही किट वाटप करण्यात आली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version