बारामती : प्रतिनिधी
बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने खबरदारी म्हणून पुढील आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. आज बारामतीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीवेळी या सुचना देण्यात आल्या आहेत.
बारामती शहर आणि तालुक्यात काल ६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून विकेंड लॉकडाऊन करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार बारामतीत विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी बारामतीत कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बारामतीत अधिकची खबरदारी घेण्याच्या सुचनाही ना. पवार यांनी दिल्या आहेत. आज झालेल्या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजनांसदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.