आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

माळेगाव अभियांत्रिकीच्या ९ विद्यार्थ्यांची झेनसॉफ्ट या अग्रेसर आयटी कंपनीमध्ये निवड

पुणे
ह्याचा प्रसार करा

माळेगाव : प्रतिनिधी   

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची झेनसॉफ्ट या अग्रेसर आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे.

माळेगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झेनसॉफ्ट कंपनीकडून प्लेसमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ॲप अँप्टीट्यूड टेस्ट, प्रोग्रामिंग टेस्ट व पर्सनल इंटरव्ह्यू या तीन स्तरांवर मूल्यांकन करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत प्रथमेश शिंदे, सुभाना कारचे, रोहित पवार,  ओंकार घाटगे, कृष्णा कुलथे, ऋतुजा काशीद,  तेजस खामकर, राजवर्धन खलाटे आणि आशिष दुधे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे नामांकित महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवला आहे. मागील दोन वर्षांमध्ये ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महाविद्यालयामार्फत नोकरीची संधी मिळालेली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नवनवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थ्यांची झालेली ही निवड ही याच उपक्रमांचे फलित असल्याचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच  रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबिनार मालिकांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत  असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. माधव राउळ यांनी दिली.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे, कारखान्याचे उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे यांच्यासह संस्थेचे विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात, सीमा जाधव, चैत्राली गावडे आणि सचिव प्रमोद शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us