बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. भल्या पहाटे अर्थात सहा वाजता ऑन फिल्ड आलेल्या अजितदादांनी विकासकामांबाबत अधिकारी वर्गाला सुचना करत कामे दर्जेदार व्हावीत यासाठी अधिक लक्ष देण्याबाबत निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी ६ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. बारामती शहरात सुरु असलेल्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय, निरा डावा कालव्याचे सुशोभीकरण, क्रीडा संकुल, कऱ्हा नदी सुशोभीकरण आदी कामांना भेटी देत त्यांनी कामाच्या दर्जाबाबत अधिकारी वर्गाला सुचना दिल्या.
विकासकामांवर बारकाईने लक्ष देऊन ती कामे अधिक दर्जेदार व्हावीत यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भर असतो. अजितदादा मुंबई-पुण्यात असोत की बारामतीत, सकाळी सहा वाजल्यापासून ऑन फिल्ड असतात. त्यामूळे साहजिकच अधिकारी वर्गाचीही भंबेरी उडालेली पाहायला मिळते. त्याचाच प्रत्यय आजही आला.
सकाळी ६ वाजता अजितदादांनी आपला दौरा सुरु केला. शहरात सुरु असलेल्या प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी बारकाईने पाहणी करत अधिकारी वर्गाला सुचना केल्या.