अत्यावश्यक सेवेतील दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू राह णार
बारामती : प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली बारामतीतील बाजारपेठ उद्यापासून सुरू होणार आहे. बारामतीतील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
बारामतीत मागील काही महिन्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे सुरुवातीला बारामतीत कडक लॉकडाऊन करत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात प्रशासनाने औषध आणि रुग्णालये वगळता अन्य सेवा बंद ठेवत कडक निर्बंध लागू केले होते. या सर्वांचा परिणाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर झाला आहे.
बारामतीतील कोरोना बाधिताच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार उद्यापासून बारामतीची बाजारपेठ सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.