Site icon Aapli Baramati News

बारामती शहरातील मोकाट कुत्र्यांना रेबीज लसीकरण

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती नगरपरिषद हद्दीमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथील नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानच्या वतीने मोकाट कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधनात्मक लसीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

मागील दोन दिवसात बारामती शहरातील विविध भागातील मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पहिल्या दिवशी १०० कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. 

बारामती शहरातील टि.सी. कॉलेज परिसर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, चंद्रविजय सोसायटी, सदगुरूनगर, महादेव मळा, जामदार रोड, रेल्वे स्टेशन परिसर, अशोकनगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. 

या मोहिमेचे आयोजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत नालंदे यांनी केले होते. सदर लसीकरण मोहिमेत डॉ. दत्तात्रय भरणे, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. रणजित जगताप, डॉ.परमेश्वर व्यवहारे व रणजित शेरकर यांनी सहभाग घेतला. तसेच बारामती रेस्क्यु टिमचे श्रेयस कांबळे, अक्षय गांधी, केतन झगडे, सुश्रुत कुलकर्णी, सचिन जानराव, प्राची आगवणे, हर्षदा सुतार, भक्ती स्वामी, अमोल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version