
बारामती : प्रतिनिधी
बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियनांतर्गत पर्यावरण व स्वच्छतेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये शहर स्वच्छतेत विशेष योगदान देणाऱ्या संत निरंकारी मंडळाच्या बारामती शाखेचा ‘स्वच्छतादूत’ म्हणून गौरव करण्यात आला.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेते सचिन सातव, आरोग्य सभापती सुरज सातव, मुख्याधिकारी महेश रोकडे, संत निरंकारी मंडळ बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक, बाळासाहेब जानकर यांच्यासह पदाधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या परिसरामध्ये स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात योगदान दिल्याबद्दल संत निरंकारी मंडळाच्या बारामती शाखेस गौरविण्यात आले. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दरवर्षी २३ फेब्रुवारी रोजी तत्कालीन सदगुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शहर व परिसरात स्वच्छता अभियान राबविले जाते.