आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

बारामतीत संजय गांधी निराधार योजनेची २३० प्रकरणे मंजूर

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीत संजय गांधी निराधार योजना समितीची संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ राज्य  वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी निवड सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये २३० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. 

संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी समिती सदस्य सुनिल बनसोडे, शिवराम माने, शहाजी दळवी, निलेश मदने, नुसरत इनामदार, जीवना मोरे, प्रविण गालिंदे आणि शासकीय सदस्य नायब तहसीलदार माधवराव भोसले तसेच अव्वल कारकून सुरेश जराड  व मदतनीस तृप्ती घोडके आदी उपस्थित होते. 

या सभेमध्ये संजय गांधी योजनेच्या १६७ अर्जांपैकी  १५९ अर्ज मंजूर झाले. श्रावणबाळ योजनेचे ७४ अर्जांपैकी ६० मंजूर, इंदिरा गांधी योजना ११ पैकी सर्व ११ प्रकरणे मंजूर करण्यात आली. सर्व योजनांसाठी आलेल्या एकूण २५२ अर्जांपैकी २३० अर्ज सर्वानुमते मंजूर करण्यात आले व नियम आणि अटीनुसार २२ अर्ज नामंजूर करण्यात आले.     

बारामती तालुका व शहरातील गरजू आणि पात्र दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, पस्तीस वर्षावरील अविवाहित, घटस्फोटीत व घटस्फोट प्रक्रियेतील महिला तसेच ६५ वर्षावरील वयोवृद्ध निराधार स्त्री व पुरुष आदींनी संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संजय गांधी योजनेचे अध्यक्ष धनवान वदक यांनी केले.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us