आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

बारामतीत संजय गांधी निराधार योजनेची १३४ प्रकरणे मंजूर

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी आज बारामतीतील प्रशासकीय भवनात बैठक पार पडली. त्यामध्ये १३४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार महादेव भोसले, सदस्य सुनिल बनसोडे, जिवना मोरे,  शिवराज माने, नुसरत इनामदार, शहाजी दळवी, लालासो होळकर, अशोकराव इंगुले आदी उपस्थित होते.

बैठकीत एकूण १४४ अर्जाची छाननी करण्यात आली.  यामध्ये संजय गांधी योजनेच्या ७५ प्राप्त अर्जापैकी ७२ मंजूर, तर तीन अर्ज नामंजूर करण्यात आले.  श्रावणबाळ योजनेच्या ५८ अर्जापैकी ५१ अर्ज मंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे आणि राष्ट्रीय कुटुंब योजनेचे सर्व प्राप्त अर्ज मंजूर करण्यात आले.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us