आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

बारामतीत श्री काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

श्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ६१ रक्तदात्यांनी उत्फूर्तपणे रक्तदान केले.

येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र रक्तच उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले होते.

या पार्श्वभुमीवर ब्लड ब्लड बँकेच्या विनंतीवरुन श्री काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान  शिबीर आयोजित करण्यात आले होते.

गेले अनेक वर्षापासुन ब्लड बँकेच्या गरजेनुसार तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. ब्लड बँकेच्या विनंती वरून गटनेते सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सुरज सातव यांनी श्री काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने शिबिराचे तत्काळ रक्तदान शिबीर आयोजित करून 61 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्थानिक रक्तपेढीतच रक्तदान करा

बारामती आणि परिसरात अनेक रक्तदान शिबिरे होतात ती शिबिरे पुणे, सोलापूर, बार्शी येथील रक्तपेढ्या बारामतीत येवून आमिष दाखवून रक्त संकलन करून जातात त्याच्या प्रत्यक्ष परिणाम स्थानिक रक्तपुरवठ्याला होतो. ज्याचा स्थानिक गरजू रुग्णाला उपयोग होत नाही. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजकांनी स्थानिक रक्तपेढीतच रक्तदान शिबीर आयोजित करावे असे आवाहन ब्लड बँकेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी केले आहे.  


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us