Site icon Aapli Baramati News

बारामतीत जैन सोशल युवा फोरमच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीतील जैन सोशल युवा फोरमच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरात 25 रक्तदात्यांनी उत्फूर्तपणे रक्तदान केले.

 येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, मानिकाबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र रक्तच उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले होते.

या पार्श्वभुमीवर ब्लड ब्लड बँकेच्या विनंतीवरुन जैन सोशल ग्रुपच्या वतीने रक्तदान  शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अनुपकुमार शहा यांच्या हस्ते आणि स्वप्नील मुथा, संगिनी फोरम अध्यक्षा अनुराधा मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

जैन सोशल युवा फोरम बारामतीचे अध्यक्ष हर्ष शहा, उपाध्यक्ष अजय मेहता, संस्कृती गुगळे, सचिव आशिष आब्ब्ड, खजिनदार प्रतिक गांधी, मानसी टाटीया, सिद्धार्थ रायसोनी, सुजय मेहता, महावीर टाटीया, आनंद टाटीया यांनी विशेष परिश्रम घेतले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version