बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील रुई रुग्णालय येथील कोविड-19 च्या रुग्णांसाठी 100 खाटांचे नवीन पोर्टेबल मॉड्युलर हॉस्पिटलचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करण्यात आले.
यावेळी अमेरीकन इंडिया फाऊंडेशनचे कंट्री डायरेक्टर मॅथ्यू जोसेफ, मास्टरकार्डचे हेड गव्हर्नमेंट एंगेजमेंटस साऊथ एशिया आर. बी. संतोषकुमार, मास्टरकार्डचे डायरेक्टर अर्यन मोबीलीटी निशांत गुप्ता, ‘एआयएफ’च्या मॅनेजर स्टॅटेजिक पार्टनरशीप सिमा व्यास, ‘एआयएफ’ प्रोजेक्ट हेड, हयूमॉनिरीटीयन प्रोग्रॅम विनय लियर, डेप्युटी रिजनल डारेक्टर, हॅबीटंट फॉर ह्युमिनीटी इंडीयाचे जॉन मॅथ्यू, नगराध्यक्ष पौणिमा तावरे, सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळै, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, रुईचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल दराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व नागरिक आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामतीमध्ये ‘सीएसआर’च्या माध्यमातून आणि अमेरिका इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने रुई रुग्णालयाशेजारी 100 बेडचे पोर्टेबल कोविड केअर युनिट उभारण्यात आले आहे. ही आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. या सुविधेचा लाभ गरीब व गरजू नागरिकांना मिळावा. कोरोनाचे संकट आल्यानंतर आरोग्य सुविधा किती गरजेची आहे हे आपणाला कळाले. नागरिकांनी निरोगी आरोग्यदायी जिवनशैली अवलंबणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शेवटी उपमुख्यमंत्री पवार यांनी या हॉस्पिटलच्या उभारणीत योगदान दिलेल्या मान्यवरांचे बारामतीकरांच्यावतीने आभार मानले.
यावेळी मॅथ्यू जोसेफ आणि संतोष कुमार यांनी अमेरिका इंडिया फाऊंडेशच्यावतीने देशात करण्यात येणा-या कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. मनोज खोमणे यांनी केले.