एका वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बाबुर्डीसाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नेहमीच विकासकामांना प्राधान्य दिले जाते. कोणत्याही गावात अधिकची कामे व्हावीत यासाठी ते आग्रही असतात. त्याचाच प्रत्यय बाबूर्डी ग्रामस्थांना आला आहे. वर्षभरात जवळपास ५ कोटी रुपयांचा निधी ना. अजित पवार यांनी उपलब्ध करून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी एकाच दिवसात २ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमीपूजन कार्यक्रम पार पडला.
मोरगाव रस्ता काळ्या ओढ्यावरील पूल बांधकामासाठी १ कोटी ४२ लाख रुपये, सुपा-लोणीभापकर ते शेरेवाडी रस्त्यासाठी ८० लाख रुपये, सुपा-लोणीपाटी ते ग्रामपंचायत कार्यालय रस्त्यासाठी १५ लाख रुपये, बाबुर्डी गावठाण अंगणवाडी, लव्हेवस्ती अंगणवाडी, शेरेवाडी अंगणवाडीसाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार रुपये, बाबुर्डी स्मशानभूमी सुधारणासाठी ३ लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमीपूजन मंगळवारी करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, उपसभापती रोहित कोकरे, बारामती बाजार समितीचे सभापती वसंत गावडे, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ भोंडवे, सुनिल भगत, प्रणिता खोमणे, पंचायत समिती सदस्या निता बारवकर, दूध संघाचे संचालक हनुमंत शेळके, बारामती बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, नानासो लडकत, सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्या मनीषा बाचकर, अर्चना पोमणे, सचिन लडकत, बाळासाहेब लव्हे, अंकुश लडकत, हौसेराव पोमणे, धनंजय पोमणे, साहेबराव पोमणे, संतोष पोमणे, राजकुमार लव्हे, गोविंद बाचकर, सागर लव्हे, योगेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी मान्यवरांकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, समाजमंदिर आदी विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. सूत्रसंचलन लक्ष्मण पोमणे यांनी केले. तर आभार भानूदास पोमणे यांनी मानले.