
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर पंचक्रोशीत पठाण टेलर या नवाने परिचित असलेले लियाकत दुलेखान पठाण यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले.
बीड जिल्ह्यातील नायगाव (मयुर) हे मूळ गाव असलेले लियाकत पठाण हे तब्बल ४० वर्षांपासून सोमेश्वरनगरमध्ये वास्तव्यास होते. याच ठिकाणी त्यांनी टेलरींगच्या व्यवसायात नाव मिळवले. मनमिळाऊ स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे लियाकत पठाण हे पठाण टेलर या नावाने सर्वदूर परिचित होते.
त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बारामती येथील पत्रकार नविद पठाण यांचे चुलते, तर बीड जिल्हा परिषदेतील पशु वैद्यकीय अधिकारी असद पठाण व सोमेश्वर येथील लोकसेवा मेडीकलचे अर्शद पठाण यांचे वडील होत.
लियाकत पठाण यांचा बीड येथील तकिया मस्जिदमध्ये शोकाकुल वातावरणात दफन विधी पार पडला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.