आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादीकडून जोरदार आंदोलन; छापेमारीचा केला निषेध

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधातील आयकर विभागाच्या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आज बारामतीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.  अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी तीव्र घोषणाबाजी करत आयकर विभाग आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.   

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर सलग दोन दिवस छापेमारी सुरू होती. काही ठिकाणी अद्यापही छापेमारीचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले. आज सकाळी बारामती शहरातील भिगवण चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच We Support Ajit Dada अशा समर्थनार्थ घोषणा देत केंद्र सरकारच्या विरोधातही संताप व्यक्त केला.

या आंदोलनात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बारामती शहर आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या चुकीच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकार जाणीवपूर्वक नेत्यांना बदनाम करत असून काहीही झाले तरी आमच्या नेत्यांविरोधात कोणतेही कारस्थान यशस्वी होणार नाही, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us