Site icon Aapli Baramati News

आयकर छापे : केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र : जयंत पाटील

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजप नेते आमच्या नेत्यांची नावे घेतात. लगेच त्यांच्या मागे इडी,  सीबीआय येते. भाजपचे आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा इतका धसका का घेतला आहे ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

आयकर विभागाने जरंडेश्वर कारखाना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधितावर सीआरपीएफच्या सुरक्षेमध्ये छापेमारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अजित पवार हे कधीच कोणते कागदपत्र लपवत नाहीत. त्यांना केवळ बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला. 

कायद्यावर आमचा विश्वास आहे. छगन भुजबळ यांना सुद्धा असाच त्रास दिला गेला. मात्र त्यांना न्यायालयाने न्याय दिला आहे असे सांगून जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही नेत्यांनी गैरव्यवहार केलेला नाही. मात्र भाजपाचा बदनाम करणे हा एकच  हेतू आहे. त्यांचा उद्देश धाड टाकून फक्त सनसनाटी निर्माण करणे एवढाच आहे.

लखीमपुर हिंसाचाराच्या घटनेवरुनही जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेला भाजपा जबाबदार असून या प्रकरणामुळे शेतकरी पेटून उठला असल्याचे त्यांनी नमूद केले. 

महाविकास आघाडी एकत्र लढेल 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्ही एकत्र लढलो नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडणुकीत अपयश आले. राज्यात महाविकास आघाडीची मोठी ताकत आहे. मात्र येणाऱ्या काळात महाविकास आघाडी निवडणूक एकत्र लढेल. भविष्यात शक्य असेल त्या महापालिकेत एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version