Site icon Aapli Baramati News

आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नात गैर काय : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सवाल

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी  

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची सरकार म्हणून भूमिका स्पष्ट आहे. परंतु पक्ष चालवताना जो तो आपली व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकालाच आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असण्यात गैर काय असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळाच्या वक्तव्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कॉँग्रेस आणि शिवसेनेकडून स्वबळाच्या वक्तव्यांबाबत विचारले असता शरद पवार यांनी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची इच्छा असते. त्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांनी एकत्र येवून स्थापन केले आहे. सरकार म्हणून तीनही पक्षांची भूमिका स्पष्ट आहे. परंतु सरकारमध्ये आम्ही एकत्रित काम करत असलो, तरी पक्ष एकत्रित चालवत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करतच असतो. साहजिकच आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असू शकते. त्यामुळे कॉँग्रेस असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी यांनी स्वबळावर बोलण्यात काहीच गैर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version