सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये नव्या चेहऱ्यांसह जुन्या संचालकांनाही संधी देण्यात आली आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, सुनील भगत आदींना पुन्हा संधी मिळाली आहे.
काल बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी उमेदवार यादी जाहीर केली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही ही यादी जाहीर केली. यामध्ये अनेकांना नव्याने संधी देण्यात आली असून जुन्या संचालक मंडळातील चेहरेही या यादीत समाविष्ट आहेत.
- राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलचे उमेदवार :
निंबूत-खंडाळा (गट क्र-१) : जितेंद्र नारायण निगडे, लक्ष्मण गंगाराम गोफणे, अभिजीत सतीशराव काकडे
मुरूम वाल्हा (गट क्र.२) : विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम रामराजे जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिवाजीराव शिंदे, ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड
होळ-मोरगाव (गट क्र. ३) : आनंदकुमार शांताराम होळकर, शिवाजीराजे द्वारकोजीराव राजेनिंबाळकर, किसन दिनकर तांबे
कोऱ्हाळे-सुपा (गट क्र. ४) : माजी उपाध्यक्ष सुनील नारायण भगत, रणजीत नंदकुमार मोरे, हरिभाऊ महादेव भोंडवे
मांडकी-जवळार्जुन (गट क्र.५): विश्वास मारुती जगताप, बाळासाहेब ज्ञानदेव कामथे, शांताराम शिवाजी कापरे
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी : प्रविण युवराज कांबळे
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : शैलेंद्र पंढरीनाथ रासकर
भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी : आनंद विनायक तांबे
महिला राखीव गट : कमल शशिकांत पवार, प्रणिता मनोज खोमणे
ब वर्ग प्रतिनिधी : संग्राम तानाजी सोरटे