Site icon Aapli Baramati News

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी ८०.७३ टक्के मतदान; गुरुवारी निकाल

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. बारामती, पुरंदर, फलटण आणि खंडाळा तालुक्यातील ८३ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये ८०.७३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

सोमेश्वर साखर कारखान्याचे एकूण २५ हजार ६७७ सभासद मतदार आहेत. आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत २० हजार ७२९ सभासदांनी आपला हक्क बजावला. २० जागांसाठी तब्बल ४६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सोमेश्वर विकास पॅनल, तर भाजपकडून सोमेश्वर परिवर्तन पॅनल रिंगणात होते. तर ब वर्ग प्रवर्गातून राष्ट्रवादीच्या संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांना कोणत्या पॅनलला कौल दिला हे गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version