बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विक्रमी मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. त्यामुळे या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पहायला मिळाली. पवार कुटुंबीयांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळख असलेल्या काकडे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत चांगल्या कामात विरोध न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक एकतर्फी होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.
प्रथमच स्थानिक पातळीवर मतदान केंद्र उपलब्ध झाल्यामुळे सभासदांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. काल झालेल्या मतमोजणीत जवळपास ९० टक्क्यांहून अधिक सभासदांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांना मते दिली.
एकूणच सोमेश्वरने दिलेला उच्चांकी भाव, मागील काळात कारखान्याची झालेली प्रगती या बाबी लक्षात घेत सभासदांनी आपले मत राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकले. त्यामुळे सोमेश्वरवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे.
गटनिहाय विजयी उमेदवार :
गट क्र. १ : निंबुत-खंडाळा गट
जितेंद्र नारायण निगडे
लक्ष्मण गंगाराम गोफणे
अभिजीत सतीशराव काकडे
गट क्र. २ : मुरुम-वाल्हा गट
पुरुषोत्तम रामराजे जगताप
राजवर्धन शिवाजीराव शिंदे
ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड
गट क्र. ३ : होळ-मोरगाव गट
आनंदकुमार शांताराम होळकर
शिवाजीराजे द्वारकोजीराव राजेनिंबाळकर
किसन दिनकर तांबे
गट क्र. ४ : कोऱ्हाळे-सुपा गट
सुनिल नारायण भगत
रणजीत नंदकुमार मोरे
हरिभाऊ महादेव भोंडवे
गट क्र. ५ : मांडकी-जवळार्जुन गट
विश्वास मारुती जगताप
बाळासाहेब ज्ञानदेव कामथे
शांताराम शिवाजी कापरे
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट
प्रविण युवराज कांबळे
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
शैलेंद्र पंढरीनाथ रासकर
भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी
आनंद विनायक तांबे
महिला राखीव गट
कमल शशिकांत पवार
प्रणिता मनोज खोमणे
ब वर्ग गट
संग्राम तानाजी सोरटे (बिनविरोध)