Site icon Aapli Baramati News

सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप; उपाध्यक्षपदी आनंदकुमार होळकर

ह्याचा प्रसार करा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी आनंदकुमार होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली.

सोमेश्वर कारखान्याच्या सभागृहात आज झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम जगताप आणि उपाध्यक्षपदासाठी आनंदकुमार होळकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रीया पार पडली. त्यामध्ये जगताप आणि होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पुरुषोत्तम जगताप यांना तिसऱ्यांदा सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर दुसऱ्यांदा संचालक झालेले आनंदकुमार होळकर यांना प्रथमच उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निरोप दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version