Site icon Aapli Baramati News

सावंतवाडीमधे ‘डीड्स फॉर नीड्स’ च्या माध्यमातून वृक्षारोपण मोहीम, संस्थेकडून पाहणी

ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram

बारामती : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून ‘डीड्स फॉर नीड्स’ च्या वतीने सावंतवाडी गावामधे मोठ्या प्रमाणावर ह्या संस्थेच्या माध्यमातून झाडांचे वाटप करण्यात येत आहे. यावर्षी देखील या संस्थेच्या वतीने गावाला १००० फळझाडे मोफत देण्यात आली आहेत. ‘डीड्स फॉर नीड्स’ च्या संस्थाचालिका संगिता सक्सेना आणि प्रिया कपाडिया यांनी सावंतवाडी गावाला भेट देऊन या मोहिमेची पाहणी केली.

‘डीड्स फॉर नीड्स’ संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडी गावात वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आली आहे. नुकतीच या मोहिमेसंदर्भात या संस्थेच्या संगीता सक्सेना, प्रिया कपाडिया यांनी सावंतवाडी गावाला भेट दिली. यावेळी सोनल कपाडिया आणि  मिसबाह मीठा यादेखील उपस्थित होत्या.

गेल्या २ वर्षात त्यांच्या संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या झाडांची पाहणी करत त्यांनी त्या झाडांची सविस्तर माहिती घेतली. गावातील लोकांनी झाडे लावण्यासाठी आणि ती जगविण्यासाठी घेतलेले कष्ट पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले.  

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावातील प्रगतशील शेतकरी धर्मराज मारुती सावंत यांच्या शेतात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुरज सावंत, शुभम सावंत, महेश सावंत, भिमराव सावंत, विजय सावंत आणि आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version