Site icon Aapli Baramati News

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही बाब लक्षात घेत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून बारामती येथील निरंकारी भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०० रक्तदात्यानी  उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामध्येही महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

शिबिराचे उद्घाटन सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या शूभहस्ते झाले. यामध्ये प्रामुख्याने इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चांदूलाल सराफ रक्त पेढी बारामती यांचा सहभाग मोलाचा ठरला. रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास टुले, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे या वेळी उपस्थित होते.

    शिबीर  यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक, सेवादल संचालक शशिकांत सकट, सेवादल शिक्षक बाळासाहेब जानकर, महिला अधिकारी वर्षा चव्हाण, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. सातारा झोनल प्रमूख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्यातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

आध्यात्मिक जनजागृती बरोबर सामाजिक बांधिलकी तत्परतेने जोपसण्याचे महान कार्य संपूर्ण वैश्विक स्तरावर संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सूरू आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य, सध्याच्या कोवीड-१९ परिस्थितीमध्ये मदत कार्य, इत्यादी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version