Site icon Aapli Baramati News

रविवारी वाघळवाडीत कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन

ह्याचा प्रसार करा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा समितीच्या सूचनेनुसार ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत  रविवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

बारामती तालुका  विधी सेवा समितीचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती जे.पी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळेमध्ये हे शिबिर होणार आहे. सर्वसामान्य नागरीकांना मोफत कायदेविषयक मदतीच्या पद्धती,  अल्प उत्पन्न धारकांना विनाखर्च न्यायालयीन सुविधा आदी विषयावर जिल्हा न्यायाधीश डी. बी. बांगडे व जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख हे मार्गदर्शन करणार आहेत.

बारामती वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड चंद्रकांत सोकटे, विधी सेवा समिती सदस्य ॲड. गणेश आळंदीकर हेही या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त नागरीकानी कायदेविषयक माहीती प्राप्त करण्यासाठी या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन वकिल संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version