बारामती : प्रतिनिधी
गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी होणारा दिवाळी भेटीचा कार्यक्रम रद्द झाला होता. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गोविंद बागेत दिवाळी भेट कार्यक्रम होणार असून संपूर्ण पवार कुटुंबिय जनतेची भेट घेणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही माहिती दिली.
बारामतीतील गोविंद बागेत दरवर्षी दिवाळीच्या पाडव्यादिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येत असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
कोरोना नियमांचे पालन करत गोविंद बागेत पाडव्यादिवशी कार्यक्रम होणार आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत असतात. एकत्रित दिवाळीचा सण साजरा करतानाच पाडव्यादिवशी राज्यातील जनतेलाही शुभेच्छा दिल्या जातात.