बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा सहभाग वाढावा आणि त्यांना या कामात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने बारामती नगरपरिषदेच्या वतीने या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा गौरव करण्यात आला. येथील अखिल तांदुळवाडी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांना नुकतेच ‘स्वच्छतादूत’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
श्रीकांत जाधव यांनी बारामती शहरातील प्रभाग क्र. १६ आणि १२ मध्ये विविध सामाजिक कामे केली आहेत. तसेच स्वच्छता मोहिम, झाडे लावा झाडे जगवा असे विविध उपक्रम हाती घेतले आहे. याबद्दल त्यांना नगरपरिषदेकडून गौरवण्यात आले.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरसेवक सूरज सातव, नवनाथ बल्लाळ, सत्यव्रत काळे, संतोष जगताप, गणेश सोनवणे, डॉ.सुहासिनी सातव, संगीता सातव, अनिता जगताप, अनिता गायकवाड, मयुरी शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.