Site icon Aapli Baramati News

बारामती उपविभागात १ ते १६ नोव्हेंबरपर्यंत कलम ३३ (१) लागू

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मुंबई पोलीस कायदा १९९१ च्‍या नियम ३३ (१)  (ओ) (यु) अन्‍वये प्रदान केलेल्‍या अधिकाराचा वापर करून बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने आदेश दिले आहेत. 

या आदेशानुसार शोभेची दारू व फटाके साठा केलेल्‍या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करणे,  कोणत्‍याही  प्रकारचे दारू काम करणे, कोणत्‍याही प्रकारचे फटाके उडवणे  या सर्व गोष्टीवर बंदी  घालण्यात आली आहे. त्याबरोबर शोभेच्‍या दारू रॅकेटचे  परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही. सदर आदेश बारामती उपविभागात १ ते १६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी लागू राहतील.

प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणारी व्‍यक्‍ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्‍या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील,असे उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version