आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहाराष्ट्रराजकारण

बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश मेळावा संपन्न

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामतीत पक्ष प्रवेश व आगामी निवडणुकांच्या संदर्भात पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी भव्य पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारामती तालुक्यातील युवक व युवतींनी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, महिला जिल्हाध्यक्षा सीमाताई भालेसेन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांनी येणाऱ्या पुणे जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर व पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांच्या माठीमागे ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. सीमाताई भालेसेन यांनी महिलांचे प्रश्न मांडून महिलांचे संघटन मोठ्या ताकतीने करणार असल्याचे सांगितले व आयोजकांचे कौतुक केले. 

येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका या सर्व निवडणुकामध्ये पक्ष बांधणी करुन वरिष्ठांच्या सूचनेनुसार उमेदवार उभे करणार असल्याचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी सांगितले. 

जिल्हा उपाध्यक्ष ॲड. वैभव काळे, जिल्हा महासचिव निलेश वामणे, ॲड. रियाज खान यांनी मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास निर्मला वनशिव, प्रियांका लोंढे, मालती बडेकर, प्रशांती साळवे, उषा वाघमारे, धिरज कांबळे, संजय गायकवाड उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगलदास निकाळजे, ॲड. वैभव काळे,  शहराध्यक्ष अक्षय शेलार, मयूर कांबळे, रोहित भोसले, विनय दामोदरे, मोहन कांबळे, ॲड. रियाज खान आदी कार्यक्रत्यांनी परिश्रम घेतले.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us