बारामती : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. बारामतीतही हा संप सुरू असून या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठींबा दर्शवला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सध्या सुरू असलेल्या आंदोलनास मनसेने पाठींबा दर्शवला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. विनोद जावळे, सचिव मयुर जाधव, संघटक निलेश कदम उपस्थित होते.
यावेळी मनसे कामगार संघटनेच्या पाठीशी असून मागण्या मान्य न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे विनोद जावळे यांनी सांगितले.