आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

बारामतीत इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; पेट्रोलपंपावर जाऊन दिल्या दरवाढीच्या शुभेच्छा

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

केंद्रातील सरकारने देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन मोकळ्या भूलथापा मारून गेली सात वर्षापासून संपूर्ण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचे पूर्णपणे वाट लावली आहे. त्यातच इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामती तालुका आणि शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेत अनोखे आंदोलन केले. 

पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किंमती वाढवून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवन आर्थिक दृष्ट्या हतबल केले आहे. कधी नव्हती एवढी प्रचंड प्रमाणात महागाई प्रत्येक गोष्टींमध्ये वाढलेली आहे.कोरोना काळात अनेक व्यवसाय बुडाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे आणि त्यातच केंद्र सरकारची सततची दरवाढ अशा परिस्थितीत सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले असून जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. 

वेगवेगळ्या प्रकारचे कर वाढवून प्रचंड दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास हिरावून महापाप या केंद्र सरकारने केले आहे. सामान्य गोरगरीब जनतेशी असंवेदनशीलपणे वागणाऱ्या केंद्र सरकारचा बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढ कमी करावी अशा मागणीचे निवेदन केंद्र सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.

बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे, शहराध्यक्ष अमर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

पेट्रोलपंपावर जाऊन दरवाढीच्या शुभेच्छा

आंदोलनानंतर गांधीगिरी मार्गाने पेट्रोल पंपावरील पेट्रोल ग्राहकांना पेट्रोल डिझेल दरवाढीच्या गुलाब फुले भेट देऊन शुभेच्छा दिल्या व केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनास राष्ट्रवादी युवक प्रदेशचे उपाध्यक्ष किशोर मासाळ,बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, बारामती तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, शहराध्यक्ष तुषार लोखंडे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश काळकुटे, सरचिटणीस ऋषी देवकाते, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष साधु बल्लाळ, राकेश सावंत, अविनाश भिसे, दादा जराड, शुभम ठोंबरे, आदित्य हिंगणे, पार्थ गालिंदे, नितीन काकडे, शंकर नाळे, पैगंबर शेख आदिंसह तालुका व शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us